अभंग

*स्वातीचे शब्दमोती*
     
               *अभंग*

असो देवा माझा  तुला नमस्कार।
 तूच एक थोर      विश्वामाजी ॥

अपार करुणा  मायेचा निर्झर ।
प्रेमाचे पाझर  तुझ्या ठायी ॥

तूच माझा विठू  तूच माझा राम ।
सावळा तो श्याम  तूच की रे ॥

ग्रासले मी देवा  वाहूनी संसारा ।
सांभाळ हा सारा  तुझा खेळ ॥

जेथे जेथे माझे  अपुरे प्रयास ।
प्राक्तनाचे फास  आवळती ॥

तेथे तेथे तू रे  सावर मजला ।
हीच रे तुजला  विनवणी ॥

चरणी तुझ्या मी  सदा लीन व्हावे ।
ओठी सदा यावे   नाम तुझे ॥

सुखाचा तो व्हावा  जीवनप्रवास ।
 हीच एक आस      "स्वाती" म्हणे ॥

© स्वाती शृंगारपुरे
18/04/2018
📞 8692893984

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं