विरह (एका बालमित्राच्या विनंतीवरून )
*स्वातीचे शब्दमोती*
गुलजार ह्या रुपाला पाहून दंगलो मी
बेधुंद होऊनिया स्वप्नात रंगलो मी
उनाड कुंतलाचा हा रेशमी पिसारा
मदहोष कुंतलात अलवार गुंतलो मी
ह्रदयी हळूच घुसती नयनांचे खट्याळ तीर
लागून तो निशाणा घायाळ जाहलो मी
हे रूप तुझे शराबी मज वाटले हवेसे
नजरेने तुला पिउनी कैफात झिंगलो मी
कळले मुळीच नाही सरला कितीक काळ
फे-यात प्राक्तनाच्या अगतिक जाहलो मी
विरह तुझा गं राणी तरीही साहवेना
विरहात आसवांनी सचैल नाहलो मी
आता नुरे ही आशा होशिल तू गं माझी
अव्यक्त प्रेम माझे गजलेत गायलो मी
"राधा" जरी नसे ही जीवनात "मोहना"च्या
मानून वास्तवाला तरी तुझाच राहीलो मी !
© स्वाती शृंगारपुरे
8692893984
गुलजार ह्या रुपाला पाहून दंगलो मी
बेधुंद होऊनिया स्वप्नात रंगलो मी
उनाड कुंतलाचा हा रेशमी पिसारा
मदहोष कुंतलात अलवार गुंतलो मी
ह्रदयी हळूच घुसती नयनांचे खट्याळ तीर
लागून तो निशाणा घायाळ जाहलो मी
हे रूप तुझे शराबी मज वाटले हवेसे
नजरेने तुला पिउनी कैफात झिंगलो मी
कळले मुळीच नाही सरला कितीक काळ
फे-यात प्राक्तनाच्या अगतिक जाहलो मी
विरह तुझा गं राणी तरीही साहवेना
विरहात आसवांनी सचैल नाहलो मी
आता नुरे ही आशा होशिल तू गं माझी
अव्यक्त प्रेम माझे गजलेत गायलो मी
"राधा" जरी नसे ही जीवनात "मोहना"च्या
मानून वास्तवाला तरी तुझाच राहीलो मी !
© स्वाती शृंगारपुरे
8692893984
Comments
Post a Comment