पहिलं प्रेम
*स्वातीचे शब्दमोती*
*पहिलं प्रेम*
बहरलेल्या प्राजक्तासारखं
गंधित आणि बेभान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
मित्र मैत्रिणी , बहीण भाऊ
कुण्णी कुण्णी आठवत नाहीत
प्रेमवेडे प्रेमाखेरीज
काही मनात साठवत नाहीत
ह्रदयपटलावरचं ते
सोनसळी पान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
" तो " आणि " ती " मग
स्वतःचे असे उरत नाहीत
गोड गोड त्या क्षणांच्या
आठवणी कधी सरत नाहीत
आतुरलेल्या पक्ष्यांचं ते
मंजूळ,सुरेल गान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
धुंद चांदणे बेभान करते
निळा चंद्रमा हसत असतो
उनही भासू लागते शीतल
पाऊस ह्रदयात बरसत असतो
थंडी, वारा उन , पाऊस
सारंच कसं बेभान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
पहिल्या प्रेमावर लिहील्या जातात
कविता आणि कथा
असतात बंध रेशमाचे
नसते कसलीच व्यथा
रंगरंगिल्या फुलांचं ते
हिरवंगार रान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
खूप खूप छान असतं...
©स्वाती सुबोध शृंगारपुरे...
📞8692893984
*पहिलं प्रेम*
बहरलेल्या प्राजक्तासारखं
गंधित आणि बेभान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
मित्र मैत्रिणी , बहीण भाऊ
कुण्णी कुण्णी आठवत नाहीत
प्रेमवेडे प्रेमाखेरीज
काही मनात साठवत नाहीत
ह्रदयपटलावरचं ते
सोनसळी पान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
" तो " आणि " ती " मग
स्वतःचे असे उरत नाहीत
गोड गोड त्या क्षणांच्या
आठवणी कधी सरत नाहीत
आतुरलेल्या पक्ष्यांचं ते
मंजूळ,सुरेल गान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
धुंद चांदणे बेभान करते
निळा चंद्रमा हसत असतो
उनही भासू लागते शीतल
पाऊस ह्रदयात बरसत असतो
थंडी, वारा उन , पाऊस
सारंच कसं बेभान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
पहिल्या प्रेमावर लिहील्या जातात
कविता आणि कथा
असतात बंध रेशमाचे
नसते कसलीच व्यथा
रंगरंगिल्या फुलांचं ते
हिरवंगार रान असतं
खरं सांगते पहिलं प्रेम
खूप खूप छान असतं
खूप खूप छान असतं...
©स्वाती सुबोध शृंगारपुरे...
📞8692893984
Comments
Post a Comment