साहित्य संमेलन अनुभव
*स्वातीचे शब्दमोती*
*साहित्य संमेलन-माझा अनुभव*
यंदाचे साहित्य संमेलन बडोद्याला होणार हे समजल्यावर आधी मन साशंक झाले. गुजराती समाजाच्या ह्या भूमीत मराठी किती जणांना समजत असेल अशी शंका वाटली.
पण सयाजी महाराजांच्या ह्या नितांतसुंदर नगरीत साहित्याला किती महत्व आहे हे शहरात प्रवेश केल्यावर लगेचच जाणवले. शहराच्या सर्वच प्रमुख भागात संमेलनाची माहिती देणारे फलक सयाजीनगरीतील सुखावह वास्तव्याची जणू ग्वाहीच देत होते. शहरात मराठी भाषिकांची संख्याही ब-यापैकी आहे.
प्रत्यक्ष संमेलनस्थळी आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताची रम्य वेळ होती. प्रचंड मोठ्या प्रांगणात व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला मोठे पडदे लावून सर्वांना कार्यक्रम पाहता यावा अशी व्यवस्था केली होती.
स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे गायकवाड ह्यांचे छोटेखानी भाषण छान झाले. तोडक्यामोडक्या मराठीत त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला व काही जुन्या आठवणी सांगितल्या. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांची भाषणे नेहमीच्याच पठडीतली वाटली. साहित्य महामंडळाचे श्रीपाद जोशी मात्र छान बोलले व त्यांनी ब-याच विषयांचा उहापोह केला.
बेळगावप्रश्न घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व्यासपीठावर येताच ' बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ' अशा घोषणा दिल्या. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्याकरिता काही कार्यकर्त्यांतर्फे निवेदन देण्यात आले. महानुभाव पंथाचेही काही कार्यकर्ते चित्रविचित्र पोशाख करून प्रांगणात फिरून सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. त्यांनीही त्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. हे सर्वच अतिशय शिस्तबद्धरित्या झाले.
साहित्यप्रेमींसाठी खानपानाची व्यवस्था बडोदेकरांनी चोख ठेवली होती. अल्पदरात मराठमोळे चविष्ट पदार्थ त्यांनी उपलब्ध करून दिले.
पुस्तक प्रदर्शात मात्र पुस्तकप्रेमींची गर्दी दिसली नाही. वाचन संस्कृती लोप पावत चालल्यासारखेच दृश्य तिथे दिसत होते. एकदोन प्रकाशकांचे स्टाॅल वगळता ब-याचशा ठिकाणी शुकशुकाटच होता.
वेगवेगळ्या दालनात सुरू असलेले परिसंवाद फारसे रंगल्याचं दिसून आलं नाही. नामवंत साहित्यिकांनीही ह्या संमेलनाकडे पाठ फिरवल्याचं लक्षात आलं. त्यामुळे फारसं काही हाती लागलं नाही अशी खंत जुन्या जाणत्या साहित्यरसिकांच्या बोलण्यातून जाणवत होती.
वेळेची शिस्त पाळण्यात बडोदेकर फारच उदासिन दिसले. कुठलाच कार्यक्रम वेळेवर सुरू होत नव्हता.
निमंत्रितांच्या कवीसंमेलनात आम्ही गेलो. परंतु अत्यंत सुमार दर्जाच्या कविता आम्हाला ऐकायला मिळाल्या. त्यामुळे कंटाळून आम्ही तिथून काढता पाय घेतला.
नवोदितांच्या कवीकट्ट्यावर मात्र उत्साह ओसंडून वाहताना दिसला. उदयोन्मुख कवींच्या कविता दर्जेदार वाटल्या. परंतु इथे फक्त स्वतःची कविता सादर करण्याचा उत्साह कवीवर्यांमध्ये दिसत होता. इतर कवींच्या कवितांना दाद देण्याची किमान थांबून त्या कविता ऐकण्याची मानसिकता कोणाचीच नव्हती. फक्त स्वतःचे सादरीकरणाचे फोटो काढण्यात आणि ते सोशल मिडीयावर टाकण्यात धन्यता मानणारा हा कवीवर्ग स्वतःचे सादरीकरण झाले की निघून जाताना दिसत होता.
ह्या संपूर्ण गदारोळात एक फोटोग्राफर प्रेक्षागृहात फिरत होता. सादरीकरण करणा-या कवींचे तो फोटो काढायचा आणि ते कवी व्यासपीठावरून उतरताक्षणी त्यांच्या मागे फिरून ते फोटो विकत घेण्यासाठी पटवायचा. इथे काही दर्जेदार कार्यक्रम सादर होत आहेत ह्याची त्याला जराही पर्वा नव्हती. आयोजकांपैकी कोणीही त्याला हटकले नाही. त्याची पटवापटवीसाठी अखंड बडबड आणि स्त्रीवर्गाच्या तिथेच बसून रंगलेल्या गप्पा तासन् तास प्रेक्षागृहात बसून कवितेचा आस्वाद घेण्यास उत्सुक असलेल्या माझ्यासारख्या कविताप्रेमींना त्रासदायक ठरत होत्या.
परंतु नवोदित कवींच्या बहुतांश कविता मात्र दर्जेदार होत्या. त्यामुळे कवीकट्टा कंटाळवाणा झाला नाही.
एकंदरीतच ह्या साहित्य संमेलनाने फारसे काही हाती लागले नसले तरीही बरेच काही हाती लागले असेही म्हणता येईल. साहित्य संमेलनाचा पेला अर्धा भरलेला आणि अर्धा रिता म्हणतात तसा वाटला. अर्थात आपल्याला गवसलेला पेला भरलेला की रिता हे ज्याचे त्याने ठरवायचे.. माझ्या वाट्याला आलेला हा पेला मात्र अर्धा भरलेला होता असेच मी म्हणेन !

खूपच सकारात्मक प्रतिक्रीया स्वाती.
ReplyDelete