विरह
*विरह*
मनास माझ्या वाटे
तू हवास जवळी खास
धुंदीत भावनांच्या
वेडे मन होई उदास
बेधुंद होऊनी मग
मन मागतसे विसावा
मिटलेल्या पापण्यांतूनीही
चेहरा तुझा दिसावा
ह्रदयांतूनी उमलती
स्वप्नफुलांचे ताटवे
मनात विहरत गाती
गोड आठवांचे रावे
अंगास झोंबतो हा
मंद थंड वारा
खट्याळ खोड्या त्याच्या
करिती हळूच इशारा
ओढाळ मन हे वेडे
झाले खिन्न उदास
चौफेर क्षणाक्षणाला
होतो तुझाच भास
ये धावत प्रियकरा
तोडून बंध सारे
बेभान ह्रदयी माझ्या
बेधुंद वादळवारे...
मनास माझ्या वाटे
तू हवास जवळी खास
धुंदीत भावनांच्या
वेडे मन होई उदास
बेधुंद होऊनी मग
मन मागतसे विसावा
मिटलेल्या पापण्यांतूनीही
चेहरा तुझा दिसावा
ह्रदयांतूनी उमलती
स्वप्नफुलांचे ताटवे
मनात विहरत गाती
गोड आठवांचे रावे
अंगास झोंबतो हा
मंद थंड वारा
खट्याळ खोड्या त्याच्या
करिती हळूच इशारा
ओढाळ मन हे वेडे
झाले खिन्न उदास
चौफेर क्षणाक्षणाला
होतो तुझाच भास
ये धावत प्रियकरा
तोडून बंध सारे
बेभान ह्रदयी माझ्या
बेधुंद वादळवारे...
Comments
Post a Comment