विरहक्षण
रोज एक कविता...
*विरहक्षण*
ह्रदयामध्ये सलणा-या
विरहाच्या जखमा मिटवून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
आठवेल का तुला आता
आपली पहिली भेट
पापण्यांच्या कमानीआडून
ह्रदये जिंकली थेट
उठतील का नयनांत
तुझ्या आठवणींचे तरंग
दिसतील का त्यात
आपल्या प्रेमाचे रंग
रंगामध्ये प्रेमाच्या
हळूच जरासा रंगून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
आठवतं का तुला आपण
सागरतीरी बसायचो
गुजगोष्टीत रमून आपण
दिलखुलास हसायचो
कळत नसे नभी कधी
अवतरायचा चांदवा
सवे त्याच्या बागडत येई
चांदण्यांचा थवा
चांदणभरल्या नभाला त्या
तुझ्या मनात साठवून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
आठवणींच्या डोहात दिसेल
आगगाडीचा प्रवास
हाती माझ्या हात तुझा
अन् हवाहवासा सहवास
सुटता गाडी सुटून जातील
हातामधले घट्ट हात
इंजिनाच्या धुरामध्ये
विरून जाईल प्रेमळ साथ
सहवासाचे रेशिमबंध
दिठीत तुझ्या दाटवून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
*स्वातीचे शब्दमोती*
*स्वाती शृंगारपुरे*
☎ 8692893984
https://www.facebook.com/rojekkavita
*विरहक्षण*
ह्रदयामध्ये सलणा-या
विरहाच्या जखमा मिटवून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
आठवेल का तुला आता
आपली पहिली भेट
पापण्यांच्या कमानीआडून
ह्रदये जिंकली थेट
उठतील का नयनांत
तुझ्या आठवणींचे तरंग
दिसतील का त्यात
आपल्या प्रेमाचे रंग
रंगामध्ये प्रेमाच्या
हळूच जरासा रंगून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
आठवतं का तुला आपण
सागरतीरी बसायचो
गुजगोष्टीत रमून आपण
दिलखुलास हसायचो
कळत नसे नभी कधी
अवतरायचा चांदवा
सवे त्याच्या बागडत येई
चांदण्यांचा थवा
चांदणभरल्या नभाला त्या
तुझ्या मनात साठवून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
आठवणींच्या डोहात दिसेल
आगगाडीचा प्रवास
हाती माझ्या हात तुझा
अन् हवाहवासा सहवास
सुटता गाडी सुटून जातील
हातामधले घट्ट हात
इंजिनाच्या धुरामध्ये
विरून जाईल प्रेमळ साथ
सहवासाचे रेशिमबंध
दिठीत तुझ्या दाटवून पहा
अधूनमधून आपल्यामधले
अलवार क्षण आठवून पहा..
*स्वातीचे शब्दमोती*
*स्वाती शृंगारपुरे*
☎ 8692893984
https://www.facebook.com/rojekkavita
Comments
Post a Comment