मुंबई कोकण सागरी प्रवास
*स्वातीचे शब्दमोती*
*मुंबई-कोकण सागरी प्रवास*
लहानपणी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही कोकणात आमच्या आजोळी जात असू. "मामाच्या गावाला" जाण्यातला आनंद अवर्णनीय होता. आत्तासारखे रेल्वेचे जाळे त्याकाळात कोकणात पसरले नव्हते. त्यामुळे पाणी कापत जाणारी बोट किंवा लाल धुरळा उडवित जाणारी एस.टी. एवढीच काय ती प्रवासाची साधने !
सुट्टी जवळ येताच आईची लगबग सुरू होई. ठेवणीतले कपडे , घरगुती कपडे ह्यांची वर्गवारी करून ते जुन्याच पण घासूनपुसून लख्ख केलेल्या पत्र्याच्या ट्रंकेत भरले जात. आजीसाठी लुगडे , मामीसाठी खण , बाळासाठी झबल्या-टोप-याची खरेदी होई.
प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी तर आम्हा मुलांचा उत्साह गगनात मावत नसे. परीक्षा आटोपलेली असे आणि शाळेची सुट्टी सुरू होई.
अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही बोटीने प्रवास करत असू. रात्रीच्या जेवणाचा डबा सोबत घेऊन आमच्या स्वा-या संध्याकाळीच भाऊच्या धक्क्यावर डेरेदाखल होत आणि फेसाळणा-या समुद्राच्या लाटा मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आमच्या उत्साहात भर घालीत. लहानपणापासूनच निसर्गवेडी असलेली मी मग तो संधीकालचा देखावा नजरेत साठवून घेत असे. एकदा का बोट धक्क्याला लागली की सामानाच्या ट्रंका चढवण्यासाठी बाबांची लगबग सुरू होई. आम्ही मुले आणि आई बोटीत चढून बसत असू. सामानाच्या ट्रंका खलाशांच्या मदतीने सामानकक्षात ठेवून बाबाही जवळ येऊन बसत आणि आम्ही बाबांचे बोट धरून संपूर्ण बोट पहायला जात असू.
नियोजित वेळी बोटीचे बंदराला बांधलेले दोरखंड सोडले जात आणि "हैया हो" चा खलाशांचा एकच गलका ऐकू येई. त्यापाठोपाठ इंजिनाची घरघर ऐकू येई आणि धरणीचे सगळे पाश तोडत ते महाकाय जहाज त्या अथांग दर्याच्या लाटांवर आरूढ होऊन कोकणच्या दिशेने मार्गस्थ होई !
लाटांचे तुषार अंगावर झेलत आमचा प्रवास "मामाच्या गावाच्या" दिशेने सुरू होई. ह्याच सागरात देशहितासाठी सावरकरांनी घेतलेल्या उडीची बाबा आठवण करून देत व अगदी सहजतेने राष्ट्रप्रेमाचा एक संस्कार आमच्या बालमनावर रुजवला जाई , जो आजही आमच्या ह्रदयात राष्ट्रप्रेमाची ज्योत जागृत ठेवतोय् !
चहूकडे पाणीच पाणी असताना ते पाणी आपली तहान भागवू शकत नाही ह्या वास्तवाची जाणीव ह्याच प्रवासात होई आणि तरीही सृष्टीकर्त्याच्या ह्या नितांतसुंदर कलाकृतीला आम्ही डोळ्यात साठवून घेत असू.
पेंगलेल्या डोळ्यांनी कोकणची स्वप्ने पहात असतानाच पहाटेपहाटे "हर्णे हर्णे" असा खलाशांचा हाकारा ऐकू येई आणि आम्ही खडबडून जागे होत असू. साने गुरुजींच्या वास्तव्याने पावन झालेली ती हर्णेची भूमी ह्या विशालकाय जहाजाच्या स्वागताला सज्ज असे. बोटीतून पटापट किना-यावर उड्या मारून खलाशी दगडाला दोरखंड करकचून बांधीत. प्रथम स्त्रीयांना व मुलांना हळूहळू हात धरून उतरवले जाई. आम्हाला घ्यायला भल्या पहाटे बंदरावर मामा आलेला असे आणि आम्ही बच्चेमंडळी धावत जाऊन मामाला बिलगत असू.
सामानाच्या ट्रंका काढून घेऊन बाबाही एव्हाना आलेले असत. मामा चटकन् पुढे होऊन बाबांच्या हातातून सामान घेत असे. आणि बंदराच्या दुस-या टोकाला उभ्या असलेल्या बैलगाडीत बसून आमचा आजोळचा प्रवास सुरू होई.
बाहेर झुंजूमुंजू झालेलं असे आणि जवळच्या महादेवाच्या मंदिरातून ऐकू येणारे काकड आरतीचे सूर आणि नादमधूर घंटानाद वातावरणाच्या मांगल्यात भर घालीत. रस्त्याच्या दुतर्फा दिमाखात उभी असलेली आंब्याची झाडे फळांच्या त्या अनभिषिक्त सम्राटांनी डवरलेली असत आणि संपूर्ण आसमंतात एक प्रकारचा आंब्याचा दरवळ भरून राही. बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळांचा लयबद्ध नाद वातावरण प्रसन्न करीत असे. पहाटेचे हे रम्य वातावरण आजोळच्या सुखावह वास्तव्याची जणू ग्वाहीच देत असे.
उगवतीच्या सूर्यकिरणांबरोबरच आम्ही गावात प्रवेश करत असू. गावाच्या मध्यभागी असलेला मामाचा दिमाखदार वाडा एकदाचा दृष्टीपथात येई आणि अंगणात आमची वाट पहात उभे असलेले आजी आजोबा आणि भावंडे पाहून मन उचंबळून येई. मग मात्र आम्ही मुले बैलगाडीतून पटापट उड्या मारून त्यांच्याकडे झेपावत असू. आनंदाला उधाण आलेले असे.
मंडळी , काळ बदलला. कोकणने कात टाकली. टुमदार खेड्यांचे शहरीकरण झाले. चारचाकी मोटारी परशुरामाच्या ह्या भुईवरून दिमाखात धावू लागल्या. रेल्वेनेही कोकणभर जाळे विणून अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आणि कोकणी जनतेच्या बुद्धीमत्तेची आणि परिश्रमांची चुणूक अभिमानाने मिरवत "कोकणकन्या" प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली !
बदल स्वागतार्ह आहेतच ; ते व्हायलाच हवेत ; पण तरीही अजूनही स्मरणात आहे तो बोटीतून केलेला कोकणप्रवास , मामाचा डौलदार चिरेबंदी वाडा आणि निघताना मामीने प्रेमाने डब्यात भरून दिलेल्या आंब्याफणसाच्या पोळ्यांची जीभेवर रेंगाळणारी सुमधूर चव !

💗💗😘
ReplyDeleteछान वर्णन स्वा . मी कधीच कोकणात बोटीने गेले नाही. आम्ही कायम ST नेच जायचो . अस वाटलं मी पण बसले आहे तुझ्याबरोबर बोटी मध्ये. 👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसुंदर प्रवास वर्णन
ReplyDeleteस्वाती, खूप खूप छान बोटीतून कोकण प्रवास. मामाचा चिरेबंदी वाडा, आजी-- आजोबा ,बैलगाडी आणि आजोळच्या
ReplyDeleteआठवणी. मन भूतकाळात जाऊन आलं.खूप आनंद मिळाला. धन्यवाद.