साई


साई
         
मज होतसे चहूकडे तुझाच भास साई
मनात माझ्या तूच तू वससी माझ्या देही

सतेज प्रसन्न मूर्ती विराजे मंदिरात
तेथून भक्तगणांस कृपादृष्टी तू पाही

शिरडीत राहूनी तू दाविले चमत्कार
लीला तुझ्या अनंत उपमाच त्यास नाही

भेद तुझ्या ठायी नसे कुणी हिंदू कुणी यवन
पावन तुझ्या निवासाने जाहली द्वारकामाई

बैसुनी निंबवृक्षातळी भक्तांस बोध केला
पवित्र गुरुस्थान ते भक्तांस मान्य होई

दर्शनासी येती रोज असंख्य भक्तगण
मैलोन् मैल अंतर ते तुडवितात पायी

श्रद्धा अन् सबुरी हे मंत्र दिले जगाला
तूच तारणहार तू बाप तूची आई

सदैव मुखाने मी साईनाम घेते
लेखणीतूनही माझ्या झरते साईरूप शाई

उरून राहसी तू शब्दांत माझ्या निरंत
कविताच माझी मग बनतोस तूच साई !

Comments

  1. सुंदर भावगित

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेन्द्रजी..

      Delete
    2. स्वाती, तू सर्वप्रथम श्री साईस्तवन करुन तुझा ब्लॉग ओपन केला आहेस. श्री साईंचे आशीर्वाद कायमच तुझ्यासोबत आहेतच. तू तुझ्या काव्य,लेखनात खूप खूप प्रगती करून आम्हा सर्वांना खूप खूप आनंद देशीलच यात कहीहि शंकाच नाही.BEST LUCK
      ----- चित्रे मावशी

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं