ब्लाॅगर

नमस्कार मंडळी...

      अखेर अस्मादिक ब्लाॅगर झाले ! ब्लाॅग तयार झाला एकदाचा ! स्वतःचा ब्लाॅग असावा हे खूप दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न साकार झालं ! सद्गुरू साईबाबांच्या आराधनेने सुरुवात करून "स्वातीचे शब्दमोती" ब्लाॅगवर झळकायला सुसज्ज जाहले !
      आता गुंफल्या जातील ह्या शब्दमोत्यांच्या सुरेख माळा..... खास तुमची वाचनाची आणि माझी लेखनाची भूक भागविण्यासाठी ! चला तर मग... होऊया आपण 'नेट'करी ; आणि करूया "शब्दमोती" ब्लाॅगची वारी !
      उद्यापासून जमेल तसं आणि जमेल तेव्हा लिहीत जाईन. अर्थात तुम्हा सर्व हितचिंतकांच्या प्रोत्साहनामुळेच मला हे शक्य होतंय् ! तुमच्या मित्रमंडळींनाही ह्या ब्लाॅगची माहिती द्या आणि त्यांनाही ह्या वाचनयात्रेत सहभागी करून घ्या .
      सर्वांनी जरूर वाचा आणि अभिप्राय द्या . तुमचा अभिप्राय माझ्यासाठी लाखमोलाचा आहे.
      धन्यवाद !

Comments

  1. छान ! आनंद वाटला. खरं म्हणजे ह्याची तुला गरज होतीच. Now sky is the limit. आता स्वातीचे शब्दमोती सुवर्ण कोशात साठत जातील आणि आम्हाला त्याचा आस्वाद घेता येईल. तुझ्या प्रयत्नाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाई.. तुमचे आशिर्वाद असेच पाठीशी राहू द्या..

      Delete
  2. Replies
    1. मनापासून धन्यवाद दीपकजी...

      Delete
    2. मनापासून धन्यवाद दीपकजी

      Delete
  3. Dil is very very very nice.

    ReplyDelete
  4. स्वाती तुझ्या ब्लॉगला खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  5. स्वाती तुझ्या ब्लाॅगला खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  6. भन्नाट आणि भन्नाटच!

    ReplyDelete

Post a Comment